परिश्रम, संघर्षातून मिळालेले यश चिरकाल टिकते

श्रीरामपूर – सतत परिश्रम, संघर्ष करून मिळालेले यश शाश्‍वत व चिरकाल टिकते. ग्रामीण भागातील युवक युवतींनी पुढे यावे, प्रश्‍न विचारावेत, ते समजून घ्यावेत, यश तुमच्या मागे येईल, असे मत “प्रभात डेअरी’चे अध्यक्ष सारंगधर निर्मळ यांनी व्यक्‍त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात उद्योग समुहाला भेट दिली असता त्यांच्यासमोर निर्मळ बोलत होते.
ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत तसेच खुल्या अर्थव्यवस्थेत वाणिज्य शाकेला विशेष महत्व आले आहे. रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणारी ही विद्याशाखा आहे. मेंदुचा कस लागेल असा झपाटल्यागत अभ्यास केल्यास यशस्वी होता येते. प्रवर्तन अवस्थेपासून प्रभातने संकटांना संधी समजून यश संपादन केले आहे. कंपन्यांमधील संपुर्ण कामकाज इंग्रजी भाषेतून चालते. तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतूनच कंपनी कायद्यांचा अभ्यास केला पाहिजे.

-Ads-

यावेळी सोनाली आने, शिवाली मगर, वैष्णवी खंडागळे, प्राजक्ता लिप्टे, शिवानी गिरमे, अतुल लबडे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना निर्मळ यांनी सविस्तर उत्तरे दिली. कंपनीचे मानव संसधन व्यवस्थापक गोविंद खैरनार, उत्पादन व्यवस्थापक राजकुमार गिरमाजी, सीएसआर व्यवस्थापक मुकुंद दुधाळे, प्रा. सुशील पवार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. डी. बी. घोटेकर यांनी भेटीचे प्रयोजन सांगितले. रोहिणी दळे यांनी आभर मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)