परिवार खोबरेल तेल आता संपुर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

पुणे – प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण सुंदर दिसावे. महिला आणि पुरूषांचे सौंदर्य खुलून दिसण्याससाठी केशरचना फार महत्त्वाची मानली जाते. सुंदर केसांची संपूर्ण देखभाल करण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड येथील एस्सेन प्रोडक्टस् इंडिया लि.ने संपुर्ण महाराष्ट्रात 100 टक्के शुध्द परिवार खोबरेल तेल बाजारात उपलब्ध केले आहे.

परिवार खोबरेल तेलाचे निर्माते एस्सेन प्रोडक्टस् इंडिया लि.चे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. भीमसेन अग्रवाल म्हणाले की, परिवार खोबरेल तेल सोबतच प्युअर केअर व सेहत खोबरेल तेल शंभर टक्के शुध्द खोबरेल तेल बॉटेल व पाऊच मध्ये परवडणार्‍या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. हे शुद्ध खोबरेल तेल पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, सारख्या महाराष्ट्रातील अनेक विस्तारलेल्या शहरात आणि या सारख्या शहरांच्या ग्रामीण भागासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि खानदेश, कोकण आदी सहित संपुर्ण महाराष्ट्रात आमच्या कंपनीने परिवार, सेहत, प्युअर केअर शुध्द खोबरेल तेल आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध केले आहे.

खोबरेल तेला सोबतच येणार्‍या सर्व सणांचा विचार करून कंपनीने सुगंधित हेअर शाईन व बादाम तेल ही आम्ही ग्राहकांसाठी विविध आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात सर्वत्र उपलब्ध केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, परिवार, प्युअर केअर व सेहत खोबरेल तेल शंभर टक्के शुध्द असल्या कारणाने हे तेल केसांना नियमित लावल्याने महिला-पुरूषांच्या केसांसाठी लाभदायक ठरेल. आमच्या कंपनीने कमीत कमी किंमतीत महिला-पुरूष, युवक-युवतींना हे शंभर टक्के शुद्ध खोबरेल तेल उपलब्ध केले आहे. हे तेल 50 एमएल पासून पाचशे एमएलच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. अग्रवाल म्हणाले की, सामान्यांपासून सर्व स्तरातील नागरिकांना स्वस्त किंमतीत सौंदर्य खुलवण्यासाठी, काळेभोर निरोगी केस मिळावे यादृष्टीने हे तेल महाराष्ट्राच्या बाजारात कंपनीच्या वतीने उपलब्ध केले आहे. याच्या नियमित वापराने महिला-पुरूषांचे केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप कमी होते आणि डैंड्रफ रहित लांब घनदाट चमकदार काळे केस लाभतात.

1 COMMENT

  1. पिपरी चिंचवड मध्ये तुमचा पत्ता व मोबाईल नंबर सांगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)