परिवाराच्या सम्मानासाठी लढणार “मुल्क’चा मोहम्मद

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर आणी तापसी पन्नू यांनी अभिनित केलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ऋषी कपूर यांनी आरोपी मुराद अली मोहम्मद, तर तापसी पन्नू हिने वकीलाची भूमिका साकारली आहे.
“मुल्क’ चित्रपटाचे पहिले पोस्टर ऋषी कपूर आणि फिल्म ट्रेंडचे विश्‍लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.

यात ऋषी कपूर हे मुराद अली मोहम्मदची भूमिका साकारत आहे. जे एका प्रकरणात आरोपी म्हणून दोषी ठरविले जातात. त्यानंतर मोहम्मद आपल्या परिवाराच्या सम्मानासाठी न्यायालयाच्या फे-यात अडकतो. हा चित्रपट जॉली एलएलबी 2, नो वन किल्ड जेसिका आणि दामिनी या चित्रपटावर आधारित असल्याचे दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाची शूटिंग बनारस आणि लखनौमध्ये झाली असून तापसी पन्नू हिने प्रथमच ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले आहे. हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे. यामध्ये ऋषी कपूर, रजत कपूर, तापसी पन्नू, प्राची शाह आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. ऋषि कपूर मुराद अली मोहम्मदची भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासाठी वकील म्हणून तापसी पन्नू न्यायालयात लढतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)