परिवर्तन : कौशल्य विकास हाच यशाचा मूलमंत्र (भाग चार )

सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ज्या देशामध्ये ज्ञान आणि कौशल्याला उच्चतम महत्त्व दिले जाते तोच देश सांस्कृतिक व सामाजिक प्रगती करू शकतो. कोणत्याही देशासाठी आर्थिक प्रगती, सामाजिक विकासाचे कौशल्य आणि ज्ञान हे प्रशिक्षण शक्ती आहेत. उच्च आणि चांगल्या स्तरावरील कौशल्य असलेले देश कामांच्या आव्हानांना आणि जगाच्या संधींना अधिक प्रभावीपणे समायोजित करतात. भारत “ज्ञानाची अर्थव्यवस्था’ बनण्याच्या दिशेने प्रगती करत असल्यामुळे हे कौशल्य वाढीवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि या कौशल्यांना उदयोन्मुख आर्थिक वातावरणाशी संबंधित असणे आवश्‍यक आहे.

आता 12 व्या पंचवार्षिक योजनेत ऑपरेशनल तपशील तयार केले गेले आहेत. भारतातील कौशल्य विकासाचे कार्य अनेक आव्हाने आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे : सर्व मिळविण्याची समानता सुनिश्‍चित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणेची वाढती क्षमता व क्षमता. बदलत्या गरजा, विशेषत: उदयोन्मुख ज्ञान अर्थव्यवस्थेच्या आजीवन जीवनशैलीचा प्रचार करणे, गुणवत्ता आणि प्रासंगिकता राखणे. शालेय शिक्षण, सरकारी व खासगी क्षेत्रातील उपक्रमांमधील विविध कौशल्य विकास प्रयत्नांमध्ये प्रभावी अभिसरण निर्माण करणे. स्टेकहोल्डर नियोजन, गुणवत्ता आश्‍वासन आणि सहभाग यासाठी संस्थांची क्षमता वाढविणे. संशोधन विकास गुणवत्ता आश्‍वासन, परीक्षा आणि प्रमाणपत्र, संलग्नता आणि प्रमाणन यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे. स्टेकहोल्डर्सचा वाढता सहभाग, कौशल्य विकासासाठी आर्थिक गुंतवणुकीसाठी पुरेशी गुंतवणूक करणे, शारीरिक आणि बौद्धिक संसाधनांना बळकट करून स्थिरता प्राप्त करणे. आपण आतापर्यंत कौशल्य विकासाचे महत्त्व व भारतातील त्याची सद्यपरिस्थिती व परिवर्तन यावर विचार केला.

परिवर्तन : कौशल्य विकास हाच यशाचा मूलमंत्र (भाग तीन )

ज्याप्रमाणे थेंबाथेंबाने सागर तयार होतो त्याचप्रमाणे राज्य, जिल्हे, तालुके, वाड्या-वस्त्या यामुळेच आपला महाकाय भारत देश तयार होतो. भारताचा विकास म्हणजे या सूक्ष्म घटकांचा विकास, अहमदनगर हा त्याचाच एक भाग. अहमदनगरमध्ये आज अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. अगदी प्राथमिक शिक्षणापासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक संस्था आहेत व या संस्थांमधून पुणे-मुंबईच्या शिक्षण संस्थांच्याच तोडीचे शिक्षण दिले जात आहे. रयत शिक्षण संस्था, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, अहमदनगर, विखे पाटील फाउंडेशन, अहमदनगर कॉलेज अशी अनेक उदाहरणे देता येतील.

अहमदनगरजवळील सुपा येथे जपान सरकारचा येऊ घातलेला प्रकल्प. अहमदनगरसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प (जेट्रो प्रकल्प) अंदाजे रु. 25 हजार कोटींचा असून यासाठी सुपा येथे मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करून पुढील काम चालू आहे. पहिल्या फेजमध्ये येथे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार असून, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिक व ऍटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या अभियंत्यांना या चार वर्षांत नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर कुशल-अकुशल कामगार, जपानी-इंग्रजी अनुवादक, इव्हेंट मॅनेजमेंट अशी कामे करणाऱ्यांसाठी चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे.

अहमदनगरमधून बाहेर जाणारे ब्रेन ड्रेन वाचविण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल.आपण आजकाल “स्मार्ट सिटी’ च्या अनेक बातम्या वाचतो व ऐकतो. भारतातील 10 शहरे स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी 7000 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये अहमदनगरचे नावही “स्मार्ट सिटी’च्या यादीत येण्यास काय हरकत आहे? अहमदनगरला स्मार्ट करावयाचे असेल तर नुसत्या मोठ्या इमारती, रस्ते मोठे असून चालणार नाही; खरी आवश्‍यकता आहे “स्मार्ट’ लोकांची. यात नागरिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कामगार वर्ग हे सर्वच स्मार्ट झाले व एकत्रितपणे प्रयत्न केले तर अहमदनगर नक्कीच स्मार्टसिटी होईल. ब्रेन ड्रेन कमी होईल व महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे खेडे ही नगरची ओळख पुसली जाईल.

   डॉ. राजकुमार देशपांडे

 प्राचार्य छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)