परिवर्तनाची क्रांती युवकांमुळे घडणार

नगर – युवाशक्‍ती हीच देशाची खरी संपत्ती असून, परिवर्तनाची क्रांती युवकांमुळे घडणार आहे. सामाजिक कार्यात युवकांच्या पुढाकाराची गरज आहे. युवकांनी उच्च ध्येय ठेवून सत्येच्या मार्गानी चालल्यास निश्‍चित यश मिळणार असल्याची भावना परिवहन महामंडळाचे तारकपूर आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे यांनी व्यक्‍त केली.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नेहरू युवा केंद्राच्या ग्रामस्वच्छता पंधरवड्यांतर्गत स्वस्तिक चौक येथील तीन नंबर बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; यावेळी कल्हापुरे बोलत होते. याप्रसंगी जय मल्हार संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, नीलम जाडकर, ऍड. महेश शिंदे, अस्मिता जावळे, अजय जाडकर, नाना डोंगरे, शिवाजी कांबळे, अमोल सोमवंशी, पोपट बनकर, अक्षय चौधरी, मनीषा खरात, मयूर पटेल, राजेंद्र बसापुरे, रोहिदास गाढवे, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, रेखा नगरे, दिनेश शिंदे, प्रा. सुनील मतकर, आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात नीलम जाडकर यांनी स्वच्छता अभियानात महिलांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी होणार असल्याचे सांगून, स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. कांतीलाल जाडकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. भ्रष्टाचार मुक्‍त, स्वच्छ भारत व दहशतवाद व जातीवाद मुक्‍त भारत घडविण्यासाठी युवकांना प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. हातात झाडू घेऊन बसस्थानकावर उतरलेल्या युवकांनी परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत उपस्थित पाहुण्यांसह प्रवाशांनीदेखील सहभाग नोंदवला. ऍड. महेश शिंदे यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, रोगराईला आळा घालण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जाडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मुकेश दुधाडे यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)