परिणिती चोप्राने निकला मागितले 5 दशलक्ष डॉलर

प्रियांका आणि निक जोनासच्या विवाहाची तयारी सुरू झाली आहे. तिची बहीण परिणितीने आपल्या बहिणीच्या लग्नात आपली हौस कशी भागवायची याची तयारीही करून घेतली आहे. लग्नामध्ये नवऱ्या मुलाचे बूट पळवण्याचेही तिने ठरवले आहे. आपल्या जिजाकडून या बुटांसाठी तब्बल 50 लाख डॉलरची वसुली करायचे तिने ठरवले आहे.

प्रियांकाने तिच्या निकटच्या मित्र मैत्रिणींना इटलीमध्ये एक मस्त बॅचलर पार्टीही दिली. प्रियांका आणि परिणितीने या पार्टीचे झक्‍कास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. परिणितीही या पार्टीमध्ये धम्माल करायला उपस्थित होती. निकलाही या फोटोवर कॉमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. प्रियांका इतकी गोड दिसते आहे की, तिच्याशी ओळख करून घ्यावी असे वाटत असल्याचे निकने म्हटले. त्यावर तिच्याशी ओळख करणे खूप कठीण आहे. पण मी एका अटीवर तुला मदत करेन. लग्नात लपवलेले बूट देण्यासाठी तू 50 लाख डॉलर देणार असशील तर मी तुझी ओळख पीसीशी करून देईन, असे परिणितीने त्याला समजावले. भारतीय चलनामध्ये ही रक्‍कम बदलली तर 36 कोटी रुपयांची वसुली परिणिती करणार आहे. निकने तिला एवढी रक्‍कम देण्याचे मान्य केले आहे. पण प्रत्यक्षात तो ही रक्‍कम देईल की नाही, हे माहिती नाही.

प्रियांका आणि निक यांचा विवाह 1 आणि 2 डिसेंबरला जोधपूरमध्ये होणार आहे. जोधपूरमधील प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाह समारंभ होणार आहे. लग्नाचा समारंभ 3 दिवस चालणार आहे. मात्र या समारंभाला बॉलीवूड किंवा हॉलीवूडमधील कोणीच स्टार उपस्थित असणार नाही. दोन्ही कुटुंबांनी ही बाब सहमतीने मान्य केली आहे. दोन्ही घरच्या खास मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. विवाहाची प्रायव्हसी जपण्यासाठी असे ठरवले गेले आहे. लग्नानंतर दोघेही आपापल्या मित्रमंडळींना एक एक स्वतंत्र रिसेप्शन देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)