चित्रा वाघ : माफी मागितली म्हणजे मेहेरबानी केली नाही
सांगली – राम कदमांनी माफी मागितली आहे. मेहेरबानी केली नाही. तसेच हराम राम महाराष्ट्राला नको आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी जरी हा विषय संपला असे जाहीर केले असले तरी आमच्यासाठी संपला नाही, असे देखील वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान, परिचारकांवर जी कारवाई झाली तशीच राम कदमांवर झाली पाहिजे, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

वाघ म्हणाल्या, भाजपा आमदार राम कदम यांनी माफी मागितली असून विषय संपला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य उद्विग्न करणारे आहे. आणि हा चंद्रकांत पाटील व भाजपासाठी हा विषय संपला असेल पण राज्यातील भगिनींसाठी संपला नाही.

राज्यातील महिलांच्या उद्रेकामुळे राम कदमांना उपरती झाल्याने त्यांनी माफी मागीतली आहे. पण माफी मागून मेहरबानी केली नाही. राम कदमांना आमचा विरोध नसून त्या प्रवृत्तीला विरोध असून अशा पद्धतीचे वक्तव्य पुन्हा कोणी करू नये यासाठी अशांना वेळीच ठेचले पाहिजे, असे म्हणत “हराम राम’ हा महाराष्ट्राला नको आहे. ही घाण काढून फेकली पाहिजे. त्यामुळे भाजपाने प्रशांत परीचारकांवर ज्या पद्धतीने निलंबनाची कारवाई केली होती. तशीच करावाई भाजपाच्या वरिष्ठांकडून आम्हाला अपेक्षित आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)