परिंचे परिसरात सावता माळी पुण्यतिथी

परिंचे – परिंचे (ता.पुरंदर) परिसरात संत शिरोमणी सावता माळी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. परिंचे, दुधाळवाडी, नवलेवाडी, घारमळकरवाडी, राऊतवाडी, वीर या गावांत यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
परिंचे व दुधाळवाडी तरुण मंडळाने आरणगाव (ता.पंढरपुर) येथील सत सावतामाळी महाराजांच्या मुळ गावातून पायी ज्योत आणली. सकाळी उत्सव मुर्तीना अभिषेक करून महापुजा करण्यात आली. संध्याकाळी दत्त मंदिरात महाआरती करून सावता माळी महाराजांची प्रतिमा सजवलेल्या रथामध्ये ठेवून ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रथाची ग्रामप्रदक्षीणा पुर्ण करुन विठ्ठल रखुमाई मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात रात्री भजनाचे व हरी जागराच्या कार्यक्रम झाल्याले धुराजी दुधाळ यांनी सांगितले. यावेळी हरिभाऊ दुधाळ, सावता दुधाळ, सतिश दुधाळ, सुभाष दुधाळ, चांगदेव दुधाळ, लहुजी दुधाळ, नितीन दुधाळ, सोमनाथ दुधाळ, अरविंद दुधाळ, रविंद्र दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)