परिंचे ग्रामपंचायतीच्या वतीने आंब्याच्या रोपांचे वाटप

परिंचे – परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबास केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील केशर जातीच्या 600 रोपांचे वाटप केल्याचे परिंचे ग्रामपंचायतीचे सरपंच समीर जाधव यांनी सांगितले. गावात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून शेतात फळ झाडे लावल्याने परिसर हिरवागार होणार आहे. तसेच यामुळे निसर्गाचे संवर्धन देखील होणार आहे. याप्रसंगी उपसरपंच सोपान राऊत, ग्रामपंचायत सदस्य धुराजी दुधाळ, हिना नवले, संतोष शेडगे, सुनील शिंदे, ग्रामसेवक शशांक सावंत समवेत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)