सासवड- सासवड येथील शिवतीर्थावरील मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या रविवारच्या 25 व्या दिवशी परिंचेकर ग्रामस्थांनी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सासवड येथे आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आंदोलनाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांमुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी असून एकीकडे सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक असून त्याबाबत चर्चा चालू आहे असे म्हणते, तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा व आंदोलन विस्कळीत करण्याचा डाव सरकारकडून रचला जात आहे असा आरोपही आंदोलकांनी केला.
सासवडच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास तब्बल पंचवीस दिवस उलटूनही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आंदोलनास भेट दिली नाही. प्रशासनाने जाणीवपूर्वक आंदोलनाकडे कानाडोळा केलेला आहे. पुरंदरचे प्रांत अधिकारी संजय आसवले यांनी ही आंदोलनास भेट दिलेली नसून शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारे आंदोलकांशी चर्चा करण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)