पराभूत झाल्यास राजकारण सोडेन – डॉ. विखे 

संग्रहित छायाचित्र

पाथर्डी – डॉ. सुजय विखे सर्वसामान्यांचा आवाज आहे. तो निवडून आला, तर बंद पडलेला विकास पुन्हा सुरू होईल. सर्वसामान्यांना ताकद देण्याचे काम तो करेल. अशा भूमिकेतून कुठलाही पक्ष आपल्याला स्वीकारायला तयार नाही. मात्र काहीही झाले तरी लोकसभा निवडणूक आपण लढविणार आहोत. मी एकदाच निवडणूक लढवितो. पराभूत झालो, तर राजकारण सोडून देईन, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी जनतेला भावनिक साद घातली.
डॉ. विखे यांनी आज तालुक्‍याचा दौरा करून विविध ठिकाणी कामांची उद्‌घाटने, भूमिपूजने केली. तालुक्‍यातील येळी येथील येळेश्‍वर देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी येळेश्‍वर संस्थानचे अध्यक्ष रामगिरी महाराज, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्या हर्षदा काकडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, युवक कॉंग्रेसचे विधानसभाध्यक्ष ऍड. प्रतीक खेडकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे नासीर शेख, मा. जि. प. सदस्य मोहन पालवे, संभाजी वाघ, सरपंच संजय बडे, महादेव जायभाये, सचिन पालवे, राष्ट्रवादीचे गहिनीनाथ थोरे, आम आदमीचे किसन आव्हाड, पृथ्वीराज आठरे, अंकुश कासुळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. विखे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब विखे व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची वैचारिक नाळ एकच होती. दोघांनी पक्षाची बंधने न पाळता सर्वसामान्यांना ताकद देण्याचे काम केले. तोच वारसा आपण कामाच्या माध्यमातून पुढे चालवू. विद्यमान खासदार पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्त्व करतात. मात्र ते देवाच्या मंदिरासमोरील सभामंडपाच्या कामात दहा टक्के घेतात. असा टोला खा. दिलीप गांधी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. पक्षाच्या कुबड्या घेऊन लढणे मला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक दत्ता बडे यांनी, तर आभार काशिनाथ बडे यांनी मानले.

पक्ष म्हणजे सुपारी घेणाऱ्या टोळ्या
विखेंना उमेदवारी का नको, याचे समाधानकारक उत्तर कुठल्याही नेत्यांकडे नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लोकसभेच्या उमेदवारीची तयारी करत आहोत. चिन्ह अथवा पक्ष महत्त्वाचे नाही. जिल्ह्यातही कोणत्याच पक्षाचे प्रभावी अस्तित्व राहिले नसून, पक्ष म्हणजे सुपारी घेणाऱ्या टोळ्या बनल्या आहेत. पक्षापेक्षा व्यक्तीकडे लक्ष द्या, असे आवाहन यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)