पराग साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक

सरव्यवस्थापक विनायक नेमाडे यांची माहिती

टाकळी हाजी, दि. 10 (वार्ताहर)- रावडेवाडी (ता. शिरुर) येथील पराग अँगो फूडस अलाईड प्रॉंडक्‍टस प्रा. लि. साखर कारखान्याचे वजन काटे अचूक असल्याचा अहवाल वजनकाटे तपासणीसाठी अचानक आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी दिला असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर विनायक नेमाडे यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुणे वैधमापनशास्त्र विभागातील वजनमापे निरीक्षक बी. पी. धुमाळ व विशेष लेखापरीक्षक श्रेणी -1(साखर) यांच्या भरारी पथकाने रावडेवाडी येथील पराग अँगो फूड्‌स अलाईड प्रॉंडक्‍टस प्रा. लि. साखर कारखान्याची बुधवार (दि.9) रोजी अचानक वजनकाट्यांची तपासणी केली. यावेळी या पथकाने उसाने भरलेली ट्रक,ट्रॅक्‍टर तसेच बैलगाडी यांच्या वजनाची कसून तपासणी केली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजनकाटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली. वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला आहे. यावेळी कारखान्याचे, मुख्य शेतकी अधिकारी अंकुश आढाव,चिफ केमिस्ट एस. एम .जाधव, चिफ इंजिनियर अशोक चोरगे, फायनान्स मॅनेजर एन. यू. वाबळे आदी अधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)