परवेझ मुशर्रफ यांची पाक सरकारकडे सुरक्षेची मागणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तान सरकारकडे पुरेशा सुरक्षेची मागणी केली आहे. 74 वर्षीय परवेझ मुशर्रफ सध्या वैद्यकीय उपचारांसाठी दुबईमध्ये आहेत. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयात परवेझ मुशर्रफ यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा खटला चालू आहे. या खटल्यासाठी पाकिस्तानात हजर राहता यावे म्हणून परवेझ मुशर्रफ यांनी पुरेशा सुरक्षेची मागणी केली आहे.

देशात आणीबाणी लागू केल्याकारणाने परवेझ मुशर्रफ यांच्यावर मार्च 2014 मध्ये राजद्रोहाचा अभियोग दाखल करण्यात आला होता. आणीबाणीच्या काळात परवेझ मुशर्रफ यांनी अनेक उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कैद केले होते, आणि 100 पेक्षा अधिक न्यायाधीशांना पदच्युत केले होते.

आपल्या अशीलाच्या जिवाला पाकिस्तनामध्ये परतल्यानंतर धोका असल्याचे निवेदन परवेझ मुशर्रफ यांच्या वकिलाने पाकिस्तानच्या गृह मंत्रालकडे सादर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)