परवानग्या नसतानाही पाथर्डीत खासगी हॉस्पिटल सुरू

पाथर्डी – शहरातील विविध खासगी हॉस्पिटल कोणत्याही विभागाची परवानगी न घेता सुरू असून, आवश्‍यक त्या विभागाकडून कसलीही कारवाई होत नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भास्कर दराडे यांनी दिली.

दराडे यांनी पालिकेकडे माहितीच्या अधिकारात शहरातील हॉस्पिटलबाबत माहिती विचारली, यामध्ये म्हटले आहे की शहरातील डॉक्‍टरांनी आवश्‍यक त्या परवानग्या घेतल्या तर नाहीच, पण अनेक हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ नर्सेस नाहीत, पार्किंगची सुविधा नाही, अधिकार नसताना काही डॉक्‍टर ऍलोपॅथीची प्रॅक्‍टिस करतात. तर, काही हॉस्पिटलमध्ये सर्जरीसुद्धा केली जाते. बेकायदेशीरपणे हॉस्पिटल चालवणाऱ्या व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या डॉक्‍टरांविरुद्ध कारवाईची मागणी दराडे यांनी केली.
या तक्रारपत्रावर पालिकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पालिकेकडे महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत एकाही हॉस्पिटलची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे डॉक्‍टर असलेले मृत्युंजय गर्जे हेच नगराध्यक्षपद भूषवत आहे हे दुर्दैवच आहे, असे दराडे यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)