परवानगी शिवाय झाडे तोडली जाणार नाहीत एमएमआरसीची हायकोर्टात हमी 

मुंबई,(प्रतिनिधी): मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी तोडली जाणारी झाडे ही यापूर्वी घेतलेल्या परवानगीनेच तोडली जात आहेत. परवानगी शिवाय एकही झाड तोडले जाणार नाही अशी हमीच एमएमआरसीने उच्च न्यायालयाला दिली. तसेच यापुढे आणखीन सुमारे 2 हजार 700 झाडे तोडण्याची परवानगी मिळलेली असून त्या बाबत जनसुनावणी सुरू आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र याबाबतची याचिका मुदतपूर्व करण्यात आल्याने न्यायालयाने याचिका निकाली काढली. यामुळे एमएमआरसीला मोठा दिलासा मिळाला आहे.
वृक्ष प्राधिकरणाने याविषयी लोकांच्या सूचना आणि तक्रारी मागवल्या असून त्यावर 10 ऑक्‍टोबरला जनसुनावणी होणार आहे. असे असताना वृक्षतोड कशी काय केली जाते. असा प्रश्‍न उपस्थित करून आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन आणि रुबेन मस्कारेनहास यांनी मुंबई मेट्रो कारशेडसाठी होत असलेल्या आरे भागातील वृक्षतोडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी एमएमआरसीने प्रतिज्ञापत्र सादर करून परवानगी शिवाय एकही झाड तोडले जाणार नाही, अशी हमी दिली. या वृक्षतोडीची भरपाई म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 22 हजार नवी रोपे लावण्यात आली आहेत. तसेच ज्या झाडांचे पुनर्रोपण होऊ शकणार नाही अशीच झाड सध्या
तोडली जात आहेत. पुनर्रोपीत होऊ शकणारी झाडे पुढच्या टप्प्यात काढली जाणार आहेत. असे आश्वासनही एमएआरसीएलच्यावतीने न्यायालयाला देण्यात आले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)