परवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले 

काही दिवसांपूर्वी झरीन खान आपल्या कुटुंबीयांसमवेत हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. तिला आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ निवांत घालवायचा होता. पण तिच्या जवळच्या टेबलावर बसलेला एक माणूस आपल्या मोबाईलमध्ये तिचे फोटो काढत असल्याचे तिने बघितले आणि तिचा ताबाच सुटला. ती जागची उठली आणि तिने या माणसाची चांगलीच खरडपट्टी काढली. तिने या माणसाला मोबाईलमधील फोटो डिलीट करायला लावले. जुहूच्या तारा रोडवरच्या एका हॉटेलमध्ये रात्रीच्यावेळी हा प्रकार घडला.

झरीनचा रागाचा पारा इतका चढला होता की हॉटेलमध्ये अगदी शांतता पसरली. हॉटेलमधील कोणीही त्या दिवशी काहीही बोलू शकले नाही. विक्रम भटच्या “1921’मध्ये ती करण कुंद्राबरोबर दिसली होती. मात्र त्या सिनेमाला बॉक्‍स ऑफिसवर विशेष यश मिळाले नव्हते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या तर स्मरणातही राहिला नसेल. “एमटिव्ही’वरच्या “ट्रोल पोलिस’मधील एका एपिसोडमध्येही झरीनने काम केले होते. सध्या तरी झरीन लाईम लाईटमध्ये नाही. पण तिला आपली सेलिब्रिटी व्हॅल्यू गमवायची नाही, हेच जुहूतील हॉटेलमधील घटनेवरून दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)