परवानगीचा निर्णय अडकला गोंधळात

महापालिकेच्या महसुलावर परिणाम : केबल कंपन्यांनाची कामे रखडली

पुणे – शहरात केबल वाहिन्या टाकण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय प्रशासन आणि शहर सुधारणा समिती यांच्या गोंधळात अडकून पडला आहे. परिणामी विविध मोबाईल कंपन्यांसह महावितरण, एमएनजीएल या कंपन्यांची कामे रखडली असून, त्याचा फटका महापालिकेच्या महसुलावर होत आहे.

-Ads-

शहरात विविध मोबाईल कंपन्यांना केबल वाहिन्या त्याचबरोबर महावितरणच्या विद्युत वाहिन्या आणि एमएनजीएलकडून गॅस वाहिन्या टाकण्यासाठी जी रस्ते खोदाई करावी लागते त्याला महापालिकेच्या पथ विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. प्रामुख्याने पावसाळ्यात अशा कामांसाठी परवानगी दिली जात नाही. त्यामुळे 1 ऑक्‍टोबर ते एप्रिल अखेपर्यंतची केबल टाकण्यासाठी मुदत दिली जाते.

यावर्षी ऑक्‍टोबर महिना सुरू होऊन आठवडा उलटूनही पथ विभागाकडून रस्ते खोदाईच्या परवानग्या दिल्या गेल्या नाहीत. शहरात रस्ते खोदाईसाठी प्रशासनाने धोरण तयार केले आहे. प्रशासनाकडून ते शहर सुधारणा समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. मात्र, या समितीने या धोरणात काही बदल सुचविले आहेत. ते पूर्ण होऊन या धोरणाला मंजुरी मिळेपर्यंत रस्ते खोदाईला परवानगी देऊ नये, असे आदेश समितीने दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांनी गतवर्षी परवानगी घेतली आहे आणि त्यांना यावर्षी कामे सुरू करायची आहेत. त्यांना केवळ एचडीडी मशीनच्या सहायानेच खोदाई करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ते परवडत नसल्याने पारंपरिक पद्धतीने खोदाई करण्यास परवानगी मिळावी, अशी या कंपन्यांची मागणी आहे.

यावर प्रशासनाने मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या सगळ्या गोंधळात रस्ते खोदाईचा निर्णय लटकला आहे. त्यावर पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर सुधारणा समितीकडे बोट दाखवून हात झटकले आहेत.

कॉल ड्रॉप प्रमाणात वाढ
शहरात मोबाईल नेटवर्क देण्यासाठी केबल टाकणे आवश्‍यक असते. मात्र, रस्ते खोदाईला परवानगी मिळत नसल्याने हे नेटवर्क टाकण्यास मोबाईल कंपन्याना अडचणी येत आहेत. त्याचाही परिणाम थेट कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढण्यात झाला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य मोबाइलधारकांना सहन करावा लागत आहे.

100 किमीच्या परवानग्या रखडल्या
पथ विभागाकडे सद्या 100 किमी रस्ते खोदाईच्या परवानग्यांसाठी अर्ज आले आहेत. मात्र, परवानगी मिळत नसल्याने ही कामे रखडली आहेत. त्याचा थेट फटका पालिकेच्या उत्पन्नावर होत असून, कोट्यवधी रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)