परवडणाऱ्या घराचे नवे खेळाडू (भाग-१)

रिअल इस्टेटमध्ये होत असलेल्या सुधारणा पाहता सरकार देखील खासगी संस्थांच्या मदतीने नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे योजनेचे ध्येय गाठण्याचे निश्‍चित केले आहे. या कारणामुळे परवडणाऱ्या घराच्या योजनेने वेग पकडला आहे. त्याचवेळी मेट्रो शहर आणि लहान सहान शहरातही प्रॉपर्टी बाजारात तेजी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारच्या या भूमिकेने गृहव्यवसायाची लोकप्रियता वाढली आहे. या कारणामुळेच हे सेक्‍टर रिअल इस्टेट डेव्हलपर्ससमवेत कर्जदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यासंदर्भात एस्सेल फायनान्स होम लोन लिमिटेडच्या सीईओ मिनी नायर यांच्या मते, 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सरकारचे स्वप्न साकार करण्यासाठी आकर्षक सबसिडी योजना आणि विकासक आणि ग्राहकांना अन्य लाभ दिले जात आहेत. यात आता प्रॉपर्टी बाजाराने नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. रिअल इस्टेट मार्केट आता विकास आणि स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात बाजारात काही काळ मंदी आली होती. आता या क्षेत्राने वेग धरल्याचे दिसून येते. गुंतवणूकदार या क्षेत्रात पैसा टाकण्यास उत्सुक आहेत. रेरा आणि जीएसटीने आत्मविश्‍वासात भर पडली आहे. कारण या सुधारणांमुळे या क्षेत्रात संपूर्णपणे बदल घडवून येत आहेत. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कजाऊ संस्था विशेषत: एनबीएफसी (नॉन बॅंकिंग फायनान्शियल कंपनी) परवडणाऱ्या घराची योजना सुरक्षित मानत आहे.

परवडणाऱ्या घराचे नवे खेळाडू (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसे पहिले तर हाऊसिंग बिझनेस हा गेमचेंजर आहे. प्रत्येक जण या क्षेत्रात लाभासाठी उतरत आहे. यातून बाजारात स्पर्धा वाढत चालली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत प्रत्येकाला त्याचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय हौसिंग फायनान्स सेक्‍टर अजूनही मोठ्या बॅंका आणि एचएफसी (हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन)शी निगडीत आहे. कारण फायनान्स करण्याच्या मजबूत क्षमतेच्या कारणाने प्रॉपर्टी बाजारावर एकाधिकारशाही प्रस्थापित केली आहे.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)