परवडणाऱ्या घराचे नवे खेळाडू (भाग-२)

रिअल इस्टेटमध्ये होत असलेल्या सुधारणा पाहता सरकार देखील खासगी संस्थांच्या मदतीने नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे योजनेचे ध्येय गाठण्याचे निश्‍चित केले आहे. या कारणामुळे परवडणाऱ्या घराच्या योजनेने वेग पकडला आहे. त्याचवेळी मेट्रो शहर आणि लहान सहान शहरातही प्रॉपर्टी बाजारात तेजी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

परवडणाऱ्या घराचे नवे खेळाडू (भाग-१)

परवडणाऱ्या घराच्या सेगमेंटमुळे लहान ग्राहकांना मार्केट खुले झाले आहे. वातावरणात वेगाने बदल होत आहे. परवडणाऱ्या घराच्या योजनेत एनबीएफसी आणि एचएफसी हे प्रभावीरित्या काम करत आहेत. गेल्या दोन वर्षात कर्ज वाटपात एचएफसीचा हिस्सा बऱ्यापैकी वाढला आहे. एकूणात हौसिंग सेक्‍टरच्या 18 टक्‍क्‍याच्या सीएसजीआर प्रोजेक्‍शनच्या तुलनेत परवडणाऱ्या घराचे सेगमेंट हे आगामी चार पाच वर्षात 30 ते 40 टक्‍क्‍याने वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षात बॅंकिंग पॉलिसीत मोठे बदल झाले आहेत. बॅंकेचे सीएसएसए किंवा डिपॉझिट कमी राहिले आहेत. बॅंका अजूनही हिशोबात अडकल्या आहेत. सध्याचे वर्ष बॅंकांसाठी खूपच वाईट ठरले. गेल्या दोन तीन वर्षातील खाते पाहिल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. परिणाम बॅंका आपल्या अंतर्गत बाबींचा निपटारा करण्यात अडकलेले असताना त्यांनी कर्जवाटपावर निर्बंध आणले आहेत. मोठ्या बॅंकांकडून कर्जावरचे आलेले बंधने पाहता एनबीएफसी आणि एचएफसीने ग्राहकांची गरज ओळख करून बाजारात प्रवेश केला आहे. आता ते ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगली सेवा प्रदान करण्याबाबत कामाला लागली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चांगली फायनान्स सिस्टिम्स गरजेची
प्रॉपर्टी बाजार हा चांगल्या फायनान्स सिस्टिमच्या आधारावर वाढत असतो. आता रेरा आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर मोठे आणि मध्यम स्वरुपाचे बिल्डर या क्षेत्रात आणि परवडणाऱ्या घरांच्या योजनेत रस दाखवत आहेत. यासाठी नॉन बॅंकिंग कंपन्यांसाठी या क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण मोठ्या बॅंकांच्या तुलनेत एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात. हीच बाब दोन्हीत अंतर निर्माण करणारे ठरू शकते. या श्रेणीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी या संधीचा लाभ संस्था घेऊ शकतात. एनबीएफसीच्या सामूहिक प्रयत्नातून 2022 पर्यंत सरकार सर्वांसाठी घरांची योजना पूर्ण करू शकते. म्हणूनच सरकार एचएफसीला परवाना देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. सरकार कर्जदात्यांना मदत करण्याबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. परवडणाऱ्या घराच्या योजनेसाठी दिले जाणारे बळ हे निश्‍चितच महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात आता मोठे खेळाडू देखील उतरले आहेत. या क्षेत्रातील संधीची उपलब्धता वाढत असल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. एनएचबी देखील कमी व्याजावर स्मॉल एचएफसी कंपनी फायनान्स उपलब्ध करून या क्षेत्राची मदत करत आहे.

स्मॉल एनबीएफसी आणि एचएफसी ही ग्राहकांना चांगली सेवा आणि कमी व्याजदारात कर्ज देण्याबाबत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात अनेक जण या नवीन उत्पादनाचा अनुभव घेण्यासाठी आणि ऐच्छिक क्रेडिट स्कोर मेथेडोलॉजीसाठी इच्छुक आहेत. पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा आधार घेत आहेत. यातून आतापर्यंत बॅंका ज्या ग्राहकांपर्यंत पोचल्या नाहीत त्यांच्यापर्यत पोचण्यासाठी मदत मिळेल. स्पर्धा वाढत असताना मात्र चार पाच वर्षात या क्षेत्रात स्थिरता येत आहे.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)