परवडणाऱ्या घरांच्या उभारणीत “क्रेडाई’चा सहभाग

पुणे – प्रधानमंत्री आवास योजना व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये “क्रेडाई’ने सक्रीय सहभाग घेतला असून, मुंबई वगळता संपूर्ण राज्यात 5 लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य क्रेडाईने समोर ठेवले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया राज्यातील 25 शहरांमध्ये दौरा करणार आहेत.
12 जानेवारी रोजी इंदापूर, बार्शी, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, 13 जानेवारीला बीड आणि नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, कागलमध्ये 17 जानेवारीला, तर 18 जानेवारीला सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण असा दौरा नियोजित करण्यात आला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील महिन्यात दौरा आयोजित करण्यात येणार आहे.

येत्या सन 2022 पर्यंत पाच लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी “क्रेडाई’ने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. यातील तीन लाखांहून अधिक घरांचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाचा आढावा, या योजनेंतर्गत काम करताना विकासकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे कटारिया यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“रेरा’ अंतर्गत प्रकल्पांच्या नोंदणीचा आढावा ते घेणार असून, त्यासंबंधिच्या अडचणींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेला बळ देणाऱ्या “क्रेडाई’ महाराष्ट्राच्या या उपक्रमात राज्य सरकारने अधिक सवलती देऊन संबंधित मंजुरींना गती द्यावी, या संबंधिचा प्रस्तावही “क्रेडाई’ सरकारकडे सादर करणार असल्याचे कटारिया यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)