परळी बस डेपोला आग, लाखो रुपयांसह कागदपत्रे जळून खाक

बीड – परळी बसस्थानकातील वितरण विभागात रात्री दोन वाजता भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांची रक्‍कम, कागदपत्रे, तिकिटांच्या मशीन जळून खाक झाल्या असून 30 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती डेपो व्यवस्थापकांनी दिली आहे. आगीमुळे अद्याप एकही बस स्थानकाबाहेर निघाली नाही.

अधिक माहिती अशी की, परळी बसस्थानकात रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये रोख रक्‍कम, 150 तिकिटांच्या मशीन जळून खाक झाल्या. त्यामुळे आज सकाळी एकही बस स्थानकाबाहेर पडली नाही. एकही बस स्थानकातून बाहेर न पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. केवळ स्थानकात बाहेरून येणाऱ्या बसची ये-जा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)