परळी-केळवली रस्त्याची दूरावस्था 

ठोसेघर – परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परळी ते केळवली या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यात साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तर कातवडी ते केळवली या दरम्यान असलेल्या घाटातील काही धोकादायक दरडींचा भाग हा रस्त्याच्या कडेला कोसळला आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

परळी ते केळवली हा रस्ता केळवली, बांबर ,कातवडी, ताकवली, खडगाव या दुर्गम गावांना परळी या मुख्य बाजारपेठेला व सातारा शहराला जोडणारा एकमेव रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून हा रस्ता मंजूर झाला आहे. गेल्या दोन-तीन वर्षात रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे यामध्ये विद्यार्थी व स्थानिक नागरिकांचा समावेश आहे तर सांडवली धबधबा यामुळे या रस्त्यावर पावसात पर्यटकांचीही मोठी रेलचेल असते रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

-Ads-

दैनंदिन या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना खड्ड्यांमुळे कंबर व मणक्‍यांच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे तरीही कोणतीही दखल संबंधित विभागाकडून घेतली जात नाही गेल्या तीन वर्षापासून रस्त्याची कोणतीही डागडुजी केली गेली नाही त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)