परळीतूनच निवडणूक लढवणार ! -धनंजय मुंडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. “मी लोकसभेची कुठलीही निवडणूक लढवणार नसून परळीतूनच विधानसभा लढवणार” असल्याचे त्यांनी जाहीर केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडे बोलत होते. दरम्यान त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

परळी मतदार संघ म्हटला राजकीय चर्चेला उधाण येत कारण ‘परळी’ पेक्षा भाऊ बहिणीचा मतदार संघ म्हणून त्याची जास्त ओळख आहे. परळी मधून सध्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आमदार आहेत. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाऊ बहिणीची राजकीय लढाई होणार आहे. ‘मी परळीतून निवडणूक लढवणार असून माझ्या विरोधात कोण लढणार हे लोकांनी ठरवावं’ असे धनंजय मुंडे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची राजसरकारकडे मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही राजकारण नाहीतर सरकारला मदत करू इच्छितो, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)