परमाणू व्यापार प्रकरणी 7 पाकिस्तानी कंपन्यांवर अमेरिकीचे निर्बंध

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेने पाकिस्तानच्या 7 कंपन्यांवर निर्बंध लागू केले आहेत. परमाणू व्यापार संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या 7 कंपन्यांवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर पाकिस्तानने अद्याप काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 22 मार्च रोजी या 7 कंपन्यांवर निर्बंध लादून त्यांना एन्टिटी लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे. अमेरिकेने लादलेल्या या निर्बंधांमुळे पाकिस्तानच्या एनएसजी गटात प्रवेश करण्याचा आशेला हादरा बसला आहे.

आपले राष्ट्रीय हित आणि परराष्ट्र नीतीच्या विरोधात काम केल्यामुळे निर्बंध लादण्याची कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन सरकारच्या एका वेबसाईटवर सांगण्यात आले आहे. अशा कारवाईत कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात येत नाही, परंतु भविष्यात आपल्या व्यवसायासाठी अशा कंपन्यांना खास लायसन्स काढणे अनिवार्य असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)