“परमाणू’ला रिलीजसाठी मुहुर्त सापडेना

2018 सालचा एप्रिल महिना निम्मा झाला आहे. अजूनही काही सिनेमांची रिलीज डेट फायनल होऊ शकलेली नाही. प्रत्येकवेळी काही ना काही अडचण येते आणि रिलीज डेट पुढे ढकलावी लागते. जॉन अब्राहमचा लीड रोल असलेल्या “परमाणू’ची रिलीज डेट पाच वेळा पुढे ढकलावी लागली आहे.

सर्वात आगोदर डिसेंबर 2017 मध्ये “परमाणू’ रिलीज होणार होती. त्यानंतर त्याच दरम्यान संजय लिला भन्साळीचा “पद्‌मावत’ही अनंत अडचणीतून वाट काढून रिलीज करण्याचे ठरले. त्यामुळे “परमाणू’ 23 फेब्रुवारीला रिलीज करायचे ठरले. पण “पद्‌मावत’पण डिसेंबरमध्ये रिलीज न होता यावर्षी 25 जानेवारीला रिलीज झाला. पण आता राणी मुखर्जीचा”हिचकी’ आल्यामुळे “परमाणू’ पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला. पण 2 मार्चला अनुष्का शर्माच्या “परी’बरोबर स्पर्धा नको म्हणून पुन्हा रिलीज पुढे ढकलला गेला. त्याच दरम्यान निर्मात्यांचा आणि जॉन अब्राहममध्ये वादाला सुरूवात झाली आणि “परमाणू’चा रिलीज अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलला गेला.

-Ads-

मात्र काही दिवसांनी आपल्या सहनिर्मितीच्या या सिनेमाला 4 मे रोजी रिलीज करण्याचे निश्‍चित केले. पण आता ही तारीख 25 मे असणार असे समजते आहे. नक्की कधी रिलीज होणार “परमाणू’ हे आता स्वतः जॉन देखील निश्‍चित सांगू शकणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)