परभणीत धनगर आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या 

परभणी: राज्यात मराठा आरक्षणावरून आत्महत्या सत्र सुरू असताना आता धनगर समाजाच्या आरक्षण मुद्‌दा जोर धरू लागला आहे. परभणीत एका तरुणाने धनगर समाजाला आरक्षण मिळाविण्यासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आत्महत्यामुळे संपूर्ण परभणीतच खळबळ उडाली आहे.
योगेश राधाकिशन कारके (वय 19) असे या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. योगेश हा सेलू तालुक्‍यातील गोमेवाकडी गावातील रहिवाशी आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज दुपारी 12.45 वाजता योगेशने गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे परभणीत खळबळ उडाली. या घटनेनंतर योगेशच्या कुटुंबीयांनी आणि धनगर समाजातील तरुणांनी योगेशचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन योगेशच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर योगेशच्या कुटुंबीयांनी हे ठिय्या आंदोलनमागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)