परफॉर्मन्स अप्रायजल तयार करताना… 

अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांकडून मार्च महिन्यात किंवा तत्पूर्वी अप्रायजल भरून घेत असतात. या अप्रायजलवरच वेतनवाढ, बढती या गोष्टी अवलंबून असतात. चांगल्या अप्रायजलसाठी केवळ वर्षभर शानदार परफॉर्मन्स पुरेसा नाही तर आपली बाजू देखील भक्‍कम करावी लागते. कामातील आणि स्वभावातील उणिवा शोधून दूर करणे गरजेचे असते. जर अप्रायजल शानदार हवे असेल तर काही खास पद्धतीचा अवलंब करावा लागेल. याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. कार्यालयातील सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध, अचानक दिलेली जबाबदारी समर्थपणे हाताळणे, कंपनीचे ध्येयधोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेणे, आपल्या कामाविषयी जागरूक राहून वेळोवेळी वरिष्ठांना माहिती देणे या गोष्टीच्या आधारावर आपले अप्रायजल उकृष्ट होईलच त्याचरोबर बॉस देखील पाच पैकी पाच मार्क देण्यास तयार होईल.

नियमित फिडबॅक : आपण आपल्या कामगिरीचा नियमित फिडबॅक, आढावा घ्यायला हवा, जेणेकरून गुणात्मक अप्रायजलची पायाभरणी होऊ शकेल. आपण नेहमीच टिम प्लेअरच्या भूमिकेत असायला हवे. कोणतिही स्थितीला सांभाळण्यासाठी सक्षम असल्याची प्रतिमा आपण कंपनीत उभारायला हवी. मजबूत टिम प्लेअर्स हे मोकळ्या मनाचे असतात. ते गरजेनुसार बदल करत असतात. कंपनीकडून मिळणाऱ्या फिडबॅकच्या आधारावर आपल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करावा. कंपनीचे हित हेच आपले हित अशी धारणा समोर ठेऊन काम करावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिणामावर फोकस : कामाच्या ठिकाणी आपण सतत प्रयत्न करण्यांऐवजी कामाच्या परिणामावर लक्ष केंद्रीत करायला हवे. जर चांगले अप्रायजल हवे असेल तर आपली अशी प्रतिमा उभी करा की त्याचा कंपनीवर सकारात्मक परिणाम पडेल. जर आपल्या प्रयत्नातून कंपनीला चांगले परिणाम हाती लागत असतील तर आपल्यालाही निश्‍चितच फायदा मिळू शकतो. कंपनीत आपल्याविषयी विश्‍वसनीय आणि दर्जेदार काम करणारा व्यक्ती म्हणून प्रतिमा साकारावी लागेल. शिकण्याची सतत इच्छा, कामात सुधारणा आणि इनोव्हेशनच्या मदतीने आपल्याला शानदार अप्रायजल मिळू शकेल.

डेटाची मदत घ्या : अप्रायजलच्या वेळी मॅनेजमेंटला आपण कंपनीच्या निकषानुसार काम करत आहात की नाही, हे पाहायचे असते. यासाठी आपण डेटाची मदत घेऊ शकतो. जर आपला डेटा आपली कामगिरी सांगत असेल तर आपल्याला निश्‍चितच फायदा मिळेल. बॉसकडे सादर होणारे अप्रायजल डॉक्‍यूमेंटच्या मदतीने तयार करायला हवे.
श्र परिणामांवर दावा सांगा : कधी कधी आपल्या कामाचा लाभ अन्य व्यक्तींना मिळू शकतो. म्हणून आपल्या कामाबाबत, भूमिकेबाबत दक्ष असायला हवे. अर्थात असा अनुभव अनेकांना आला असेल. कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदारी उचलूनही आणि काम वेळेत पूर्ण करुनही त्याचे श्रेय अन्य मंडळी घेतात. परिणामी आपल्या पदरात नुकसान पडते आणि भविष्यात त्याचा फायदा होत नाही. अप्रायजलच्या वेळी अशीच स्थिती राहिली तर त्याचा नकारात्मक परिणाम दिसेल. तेव्हा व्यवस्थापनाच्या निर्णयाने आपण समाधानी नसाल तर आपले म्हणणे आणि कामाचे स्वरुप बॉसच्या आणि व्यवस्थापकाच्या कानावर घालणे गरजेचे आहे.

कामाच्या यशाचे श्रेय घेताना अपयशही पचवण्याची तयारी दाखवायला हवी. यातून आपण शिकत असल्याचा संदेश व्यवस्थापनाकडे जातो आणि सुधारणांच्या कृतीने कंपनीला लाभ मिळू शकतो. अशावेळी कंपनीचा आपल्यावर विश्‍वास बसतो.

– सतीश जाधव 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)