परप्रांतीय तरूणीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षे सक्‍तमजुरी

पुणे – परप्रांतीय महाविद्यायलीन तरूणीवर बलात्कार करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडित तरूणी चतुःश्रृंगी टेकडीवर पुस्तक वाचत बसली होती. यावेळी आरोपीने चोरीच्या इराद्याने हा घृणास्पद प्रकार केल्याचे तपासामध्ये समोर आले होते.

विजय विश्‍वास कांबळे (22, रा. पांडवनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 18 वर्षीय पीडित तरूणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 24 फेब्रुवारी 2016 रोजी घडली होती. खटल्यास अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी सात साक्षीदार तपासले.

पीडित तरूणी ही चतुःश्रृंगी परिसरातील नामांकीत महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पश्‍चिम बंगाल येथून आली होती. तिच्या महाविद्यालयाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी होती. त्यानंतर ती 5 ते 6 वेळेतमध्ये जिमसाठी जात होती.

जिम संपल्यानंतर कॉलेजजवळ असलेल्या हनुमान टेकडीवर ती गोष्टीचे पुस्तक वाचण्यासाठी जात होती. घटनेच्या दिवशीही ती जीम संपल्यानंतर पुस्तक वाचण्यासाठी गेली होती. जवळच तिची पर्स ठेवलेली होती. पुस्तक वाचता-वाचता 7 वाजले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची पर्स चोरून नेली. पीडित मुलगी तिच्या रूमवर गेल्यानंतर घडलेली सर्व हकिकत मैत्रिणीला सांगितली.

यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्यात तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी केला. खटल्यात अतिरिक्‍त सरकारी वकील संजय पवार यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. खटल्यात पीडित मुलीची साक्ष आणि आरोपीकडे पीडित मुलीची सापडलेली कागदपत्रे यावरून आरोपीला सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)