परप्रांतीयाकडून बालिकेवर अत्याचार

वाघोली- पेरणे फाटा (ता. हवेली) येथे चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका परप्रांतीय नराधमास अटक केली आहे. मिंटू रवी मंडल (रा. पेरणे फाटा), असे नराधमाचे नाव आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांनी माहिती दिली की, पेरणे फाटा येथे कामठे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मंडल याने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका चार वर्षांच्या मुलीला पैशाचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार केले. मुलगी रडायला लागली असता गळ्याला बांधून तिला मारहाणही केली. दरम्यान, मुलीने याबाबत आईला सांगितल्यावर नातेवाइकांनी त्वरित लोणीकंद पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)