परप्रांतीयांना जमिनी विकणे थांबायला हवे : राज ठाकरे

मुंबई : सरकारचा कोणताही प्रकल्प व्हायचा असेल तर तो प्रथम धनदांडग्यांना समजतो, ते जमिनी विकत घेतात. म्हणजेच सरकारमधील माणसे पॉलिसी विकतात असाच प्रकार घडतो. त्यामुळे परप्रांतीयांना जमिनी विकणे थांबायला हवे असे, नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

जमीनदार शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार बनविण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत असेही ते म्हणाले. कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज ठाकरे बोलत होते. सौदीच्या कंपनीची नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात भागीदारी आहे. त्यामुळे कोकणात परबांच्या ठिकाणी अरब येतील, म्हणजेच परब गेले आणि अरब आले असे चित्र उभे राहील असा मार्मिक टोला ही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)