परप्रांतिय गुन्हेगार, तपासाची बोथट धार!

गणेश राख 

आंध्रप्रदेश, गोवा, राजस्थानातील गुन्हेगारांची संख्या सर्वाधिक


 पुण्यात गुन्हे करून आरोपी काही तासांतच होतात पसार


तपासासाठी परराज्यांत जावे लागत असल्याने तपास मंद

पुणे- चोरी, दरोडे, लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. यांतील बहुसंख्य गुन्हेगार परराज्यांतील असल्याने त्यांच्या तपासासाठी पोलिसांचा प्रचंड वेळ जात आहे. यातील काहींना जेरबंद करण्यात यश आले असले, तरीही आंध्रप्रदेश, गोवा, राजस्थान अशा परराज्यातील गुन्हेगारांची संख्या मोठी असल्याचे तपासातून समोर आले आहे. यातील काहींना जेरबंद करण्यात पोलिसांना काही अंशी यश आले असले, तरी परराज्यातील गुन्हेगार सक्रिय आहेत. एखादा गुन्हा केल्यानंतर हे चोरटे अवघ्या काही तासांत आपल्या राज्याच्या दिशेने पसार होतात. यामुळे त्यांचा मागोवा काढत त्यांना जेरबंद करण्यासाठी परराज्यांत जावे लागते. या गुन्हेगारांच्या वाढत्या उपद्‌व्यापामुळे शहर पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.

घटना क्र. 1
फरासखाना पोलीस ठाणे हद्दीतील एका सराफा दुकानावर नेपाळमधील पाच जणांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला. येथून पळून जाताना पाच जण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. यातील एकाची ओळख पटल्याने आरोपी जेरबंद करण्यास पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले. परंतु दरोडा टाकून आरोपी नेपाळला जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघले होते. तेथून ते डेहराडून एक्‍सप्रेसने नेपाळला जाणार होते. परंतु चाणाक्ष नजरेने केलेल्या तपासातून पोलिसांनी अखेर त्यांना जेरबंद केले.

घटना क्र.2
मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंध्रप्रदेशातील 14 जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. हे सर्वजण आंध्रप्रदेशातील आहेत. हत्यारांसह त्यांना पोलिसांनी पकडले. दरोडा टाकण्याआधीच मिळालेल्या माहितीमुळे हा गुन्हा घडला नाही. परंतु या 14 जणांच्या चिन्ना कुनचाल्ला व माधव गोगाला अशा दोन टोळ्या कार्यरत होत्या. त्यांनी हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर, विमाननगर परिसरात गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यांची आणखी एक टोळी असून तिचा लिडर व्हिटर पिटला आहे. तो सध्या गॅंगसह पसार आहे.

घटना क्र.3
काही दिवसांपूर्वी शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडे जवळपास 6 किलो गांजा सापडला. हे चौघेही गोवा राज्यातील आहेत.त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र दोघे जण पसार झाले.

घटना क्र.4
उंड्री येथील एका हार्डवेअर दुकानात कामाला असणाऱ्या राजस्थानातील एकाने दुकानाच्या बनावट चाव्या बनवून दुकानातील 4 लाख लंपास केल्याची घटना घडली. मात्र, या कामगाराला जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले. त्यामुळे स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या परराज्यातील लोकांना कामावर घेताना नागरिकांना देखील विचार करावा लागणार आहे.

परप्रांतिय गुन्हेगारांवर आळा घालायचा कसा?
शहरातील गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरत आहेत. मात्र, परराज्यातून येऊन गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसविणे पोलिसांसमोर आव्हान आहे. परराज्यातील गुन्हेगार एखादा मोठा गुन्हा करुन लागलीच त्यांच्या राज्याच्या दिशेने पसार होतात. यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना परराज्यात जावे लागते. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व संबंधित पोलीस ठाण्यांचे पथके नेहमीच वेगवेगळ्या राज्यात तपासासाठी जातात. फरासखाना हद्दीतील सराफा दुकान प्रकरणातील आरोपी नेपाळच्या दिशेने पळण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)