परप्रांतिय कामगाराने केले घर साफ

  • सुमारे 1 लाख 37 हजाराचा ऐवज चोरीस : शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिरुर – तर्डोबाची वाडी (ता.शिरुर) येथील थापेमळा येथे गोठ्यात काम करणाऱ्या परप्रांतिय कामगाराने घरातून सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किंमतीची (चार तोळे वजनाची) चैन, 20 हजार रुपये किंमतीचे घड्याळ आणि रोख रक्कम असे मिळून एक लाख 37 हजार दोनशे रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नितीन ज्ञानदेव कर्डिले (वय-35,रा.थापेमळा, तर्डोबाचीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कर्डिले यांनी कामगाराव संयश व्यक्‍त केला असून त्यानेच घर साफ केल्याचे सांगितले आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन कर्डिले यांचा थापेमळा येथे दुग्धव्यवसाय असून त्यांच्याकडे 15 म्हशींचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यावर उत्तरप्रदेश येथील कामगार देखभाल करण्याचे काम करत होता. रात्रीच्या सुमारास कर्डिले हे जेवण केल्यानंतर झोपण्यास गेले. झोपण्यापूर्वी फिर्यादी यांनी गळ्यातील चैन, मनगटी घड्याळ, व रोख रक्कम आदी वस्तू घारातील टि.व्हीवर ठेवून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पाहिले असता त्यांना वस्तू मिळल्या नाहीत. त्यांनी कामगार राहत असलेल्या ठिकाणी पाहिले असता त्या खोलीस कडी लावल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या कामगाराचा इतरत्र शोध घेतला. परंतु तो मिळुन आला नाही. म्हणून याप्रकरणी पोलिसात चोरीची फिर्याद देण्यात आली आहे. याचा तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)