‘परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा राखून ठेवा’

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठात उपलब्ध असलेल्या वसतिगृहात काही जागा राखून ठेवण्यात यावी, असा ठराव अधिसभा सदस्य शामकांत देशमुख यांनी मांडला आहे. त्याचप्रमाणे शिखर संस्थांकडून वेळोवेळी होणारे बदल सर्वांना कळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची शिफारस देशमुख यांनी अधिसभेद्वारे केली आहे.

विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात परदेशी विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील वसतिगृहात काही जागा राखून ठेवल्यास योग्य ठरेल, असेच देशमुख यांचे म्हणणे आहे. वसतिगृहातील जागा राखीव ठेवल्यास, त्या ठिकाणी परदेशी विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे निवासाची सोय होऊ शकते, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठात सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात. नवे अधिकारी, पदाधिकारी यांच्या नियुक्‍त्या, बदल्या होत असतात. याबाबत विद्यापीठ संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाशी संबंधित असलेल्या शिखर संस्थांद्वारे होणारे बदल तत्काळ करण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे अधिसभेत बहुतांश सदस्य नव्याने निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले आहे. मात्र, अधिसभेत ठराव येण्यापूर्वीच विद्यापीठाने थंड हवेच्या ठिकाणी कार्यशाळा घेऊन नवा पायंडा निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)