परदेशी मुले जन्मदात्याच्या अंत्यविधीलाही येत नाहीत

मंचर -आजकाल परदेशात असणाऱ्या मुलांना जन्मदात्या आई, वडीलांच्या अंत्यविधीला यायला वेळ नाही. ती मुले मोबाईल तसेच ईमेलवरून शोक संदेश पाठवत आहे. ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी लोकाचे उंबरे झिजवले. तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून स्वतःच्या पायावर उभे केले. त्या आई-वडिलांना आता परदेशात गेलेली मुले विसरू लागली आहेत, अशी खंत समाजप्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांनी व्यक्त केली.

नांदुर येथे समाजप्रबोधनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. यात्राकाळात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, सरपंच वनिता जाधव, यशवंत कानडे, किसन कहडणे, नामदेव वायाळ, दशरथ भालेराव, सखाराम भालेराव, विलास चिखले यांच्यासह आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

निवृत्तीमहाराज म्हणाले, सर्वात मोठा धर्म हा वारकरी सांप्रदाय आहे. काही लोक काशीला जाऊन आंघोळ करतात. तर काही लोक ओढ्याला आंघोळ करतात. याने फक्त शरीर शुद्ध होते पण अंतर्मन काही शुद्ध होत नाही. अंतर्मन शुद्ध व्हायचे असेल तर वारकरी संप्रदायाच्या अधीन जाऊन आई वडिलांची मुलांनी सेवा केली पाहिजे. माणसाने मी पणा सोडा, राग आवरा व अहंकारी वृत्ती सोडा. जर संस्कृती असेल तर मुले चांगली घडतील. आई मुलांच्या चुकांवर पांघरुन घालण्याचे काम करते. त्या कारणाने मुले बिघडत चाललेली आहेत. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने उपसरपंच स्वप्नील जाधव, मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव, माजी सरपंच राजेंद्र जाधव, मधुकर जाधव, सरपंच तुकाराम वायाळ, माजी सरपंच सयाजी चिखले, संतोष वायाळ, पोलीस पाटील रवींद्र विश्वासराव, माजी सरपंच सुहास चिखले, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश वायाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी यात्रा उत्सव व्यवस्थित चोख पार पाडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)