परदेशी मानांकनांवर विसंबून राहू नका- उच्च न्यायालय

मुंबई : ‘विमान प्रवास करणाऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण एअरबस निओ ३२० विमानांतील सीरिज ४५० च्या पुढील सर्व एअरक्राफ्ट इंजिन सेवेतून बाद ठरवण्यात आली आहेत.’ अशी हमी डीजीसीएने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. तर सीरिज ४५० ते सीरिज ६१४ या दरम्यानचे कुठलेही इंजिन आमच्या सेवेत नाही अशी ग्वाही इंडिगोच्यावतीनं सोमवारी उच्च न्यायालयात  देण्यात आली. कारण कोणतंही एअरक्राफ्ट इंजिन हे ऑर्डर दिल्यास ८ तासांत उपलब्ध करून दिले जाते. अशी माहितीही उच्च न्यायालयाला करुन देण्यात आली.

डीजीसीएच्या दाव्यानुसार पी अँड डब्ल्यूचं एअरक्राफ्ट इंजिन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही धोका नाही. अमेरिकन बनावटीचं हेच इंजिन असलेली अनेक विमान जगभरात सेवेत आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचं अथवा चिंता करण्याचं कोणतही कारण नाही. त्यामुळे ही जनहित याचिका निकाली काढावी अशी विनंती डीजीसीए आणि केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

‘सर्व विमानांची नियमतपणे काटेकोर देखभाल केली जाते. असं असलं तरी केवळ परदेशी मानांकनांवर विसंबून न राहता डीजीसीएनं भारतीय प्रमाणांनुसार एअरक्राफ्ट इंजिनची योग्यता तपासून मगच त्यांना वापरण्याची परवानगी द्यावी.’ असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर पुढील सुनावणी आता ११ जून रोजी ठेवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)