परदेशी पर्यटकांमुळे उत्पन्नात वाढ 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – परदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे परकीय चलनाची या क्षेत्रातून आवक वाढली आहे. एप्रिल2017 च्या तुलनेत एप्रिल 2018 मध्ये परकीय विनिमय उत्पन्नात 10.2 टक्‍के वाढ झाल्याचा पर्यटन मंत्रालयाचा अंदाज आहे. एप्रिल 2018 मध्ये 15 हजार 713 कोटी रुपये इतके परकीय विनिमय उत्पन्न प्राप्त झाले. एप्रिल 2017 मध्ये हे प्रमाण 14 हजार 260 कोटी रुपये इतके होते. या वर्षभरात विकासदरात 10.2 टक्‍के इतकी वाढ झाली. एप्रिल 2018 मध्ये परकीय विनिमय उत्पन्न 2.393 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके झाले.

एका वर्षापूर्वी एप्रिल 2017 मध्ये हे उत्पन्न 2.211 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते. या विकासदरात वर्षभरात 8.2 टक्‍के वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या समकालावधीच्या 9.044 अब्ज असे डॉलरच्या परकीय विनिमय मिळकतीच्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल 2018 या चार महिन्यांच्या कालावधीत ही मिळकत 10.621 अब्ज असे डॉलर इतकी म्हणजे 10.4 टक्‍के इतकी झाली. मागील वर्षीची वृद्धी 17.5 टक्‍के होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)