परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली -फेब्रुवारी महिन्यात देशात 10.53 लाख परदेशी पर्यटक आले. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 9.56 टक्‍के पर्यटक आले होते.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यात भारतात आलेल्या पर्यटकांची संख्या 10.1 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात देशात 21.19 लाख पर्यटक आले. यात 9.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. भारतात सुमारे 15 देशातून परदेशी पर्यटक आले. यात सर्वाधिक पर्यटक बांगलादेश, त्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनमधून आले.
ई व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या यंदा 2.76 लाख इतकी होती. गेल्यावर्षी ही संख्या 1.70 लाख इतकी होती. त्यामुळे ई व्हिसावर येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या 62.0 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)