परदेशी गुंतवणुकीत वाढ शक्‍य

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यात उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये गडबड दिसत असूनही भारतीय भागबाजारात वेगाने प्रगती होत आहे. आर्थिक आणि राजकीय स्थिरता, वाढती वाढ आणि देशांतर्गत वाढणारी गुंतवणूक अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहे, असे मार्गन स्टॅनलीने म्हटले. विदेशातील गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढली आहे. देशातील भागबाजाराने उत्तम कामगिरी केल्यास विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ परत येण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. सेन्सेक्‍समध्ये सकारात्मकतेने जून 2019 पर्यंत निर्देशांक 44 हजार अथवा नकारात्मक वातावरणाने 26,500 पर्यंत घसरू शकतो.

चालू वर्षात सेन्सेक्‍समध्ये 11 टक्‍क्‍यांची तेजी आली. पुढील वर्षात सार्वत्रिक निवडणुका असूनही बाजारात तेजी आहे. जीडीपीच्या तुलने कंपन्यांचा नफा तुलनेने अत्यल्प आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर उलट परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले. मध्यवर्ती बॅंकेकडून रेपोदरात वाढ करण्याची शक्‍यता असून बाजारासाठी ते चांगले संकेत आहेत. शेअर आणि कर्ज रोखे बाजारातील परकीय गुंतवणूक कमी झाल्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)