परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर- मुख्यमंत्री

मुंबई – थेट प्रत्यक्ष गुंतवणूक (एफडीआय) येण्यात देशामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी विधानपरिषदेत दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,2015-16 मध्ये देशाच्या एकूण एफडीआय पैकी 23 टक्के एफडीआय महाराष्ट्रात आली आहे. 2016-17 मध्ये 45.24 टक्के तर 2017-18 मध्ये 32 टक्के इतकी थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

राज्य औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर आहे. राज्याचा औद्योगिक उत्पादन वाढीचा दर 2014-15 मध्ये 5.1 टक्के, 2015-16 मध्ये 8.2 टक्के, 2016-17 मध्ये 8.3 टक्के तर 2017-18 मध्ये 7.6 असा उत्कृष्ट राहिला असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)