परदेशात पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली -जानेवारी महिन्यात भारतीयांनी विदेशात विक्रमी प्रमाणात पैसे पाठविले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये दुप्पट वाढ झाली. विदेशी विद्यापीठांत शिकणाऱ्या पाल्यांची फी, पर्यटन आणि विदेशात राहणाऱ्या नातेवाईकांसाठी मोठया प्रमाणात पैसे पाठविण्यात आल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आले. आरबीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये 1.2 अब्ज डॉलर्स विदेशात पाठविण्यात आले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 10 महिन्यांमध्ये 8.71 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले होते.

गेल्या वर्षी समान कालावधीत हा आकडा 4.6 अब्ज डॉलर्स होता. नियमानुसार भारतीय व्यक्ती विदेशातील एकूण 2.5 लाख डॉलर्स पाठवू शकतो. भारतीयांकडून खर्च होणाऱ्या एकूण रकमेपैकी 90 टक्‍के भेटवस्तू, नातेवाईकांसाठी भेटवस्तू, पर्यटन, शैक्षणिक खर्च यासाठी खर्च होतो. भारतीयांकडून विदेशात होणाऱ्या खर्चात वाढ होत आहे. पर्यटन आणि पाल्यांना शैक्षणिक खर्चासाठी मोठी रक्कम देण्यात येते. 2003 मध्ये देशाचा विदेशी चलन साठा 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यावर आरबीआयने नागरिकांना विदेशातील विविध खात्यामध्ये पैसे पाठविण्यास मंजुरी दिली.

वर्षासाठी 50 हजार डॉलर्सची असणारी मर्यादा हटविण्यात आली असून ती 2.5 लाख डॉलर्स करण्यात आली. विदेशामध्ये असणाऱ्या नातेवाईकांना गुंतवणूक करण्यास मदत होत आहे. मात्र ही परंपरा कायम राहिल्यास चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याचा परिणाम देशाच्या चलनावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भारताकडे 400 अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन साठा आहे, मात्र त्या तुलनेत 9 अब्ज डॉलर्स हा आकडा लहान आहे, असे काही तज्ञांचे मत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)