‘परदेशात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार’

पुणे – भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची 37 देशांमध्ये केंद्र कार्यरत आहेत. त्या देशांमध्ये अभिजात शास्त्रीय संगीत, प्राच्यविद्या, मेहंदी, रंगावली या विषयांमध्ये कुतूहल आहे. यासंबंधी आयसीसीआर भारत अध्ययनाचे परदेशामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

प्रत्येक वेळी तेथे जाऊन शिक्षण देता येणे शक्‍य नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे “आयसीसीआर’चे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. इराणमधील तेहरान येथे संस्कृत आणि पर्शियन आदान-प्रदान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही प्राचीन भाषा असून पाणिनी हेच या भाषांचे व्याकरणकार आहेत. इराणच्या अध्यक्षांनी रुची दाखविल्यामुळेच हे चर्चासत्र झाले. परदेशातून शिक्षणासाठी भारतामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेची माहिती आयसीसीआरतर्फे दिली जाते. मेहंदी, संस्कृत, प्राच्यविद्या अशा विविध विषयांमधील आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील तज्ज्ञांची सूची करण्यात येत आहे. भारताच्या या कलांची व्याप्ती, उपयुक्‍तता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या उद्देशातून दृष्टिकोन पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध देशांशी आर्थिक, सामजिक आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल, असा विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्‍त केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)