परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

ऑनलाईन अर्जास मुदतवाढ : 10 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

पुणे – उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येत आहे.

संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आणि आवश्‍यक प्रमाणपत्र, कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 15 ते 30 ऑक्‍टोबर 2018 अशी मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्‍यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्‍यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 17 नोव्हेबरपर्यंत जमा करणे आवश्‍यक आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे, अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्‍यक प्रमाणपत्र, कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे आवश्‍यक असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)