परतीच्या सोहळ्यात माउलींचे नीरा स्नान उत्साहात

पांडुरंगाचे दर्शन घेऊन पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल 
नीरा – आषाढी वारीतील पांडुरंगाच्या दर्शनानंतर गुरुवारी (दि. 2) संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील पाडेगाव यथे काल माउली सोहळ्याचा मुक्काम होता. आज गुरुवारी (दि. 2) सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माउलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी दिल्या. आरफळकरदिनकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माउली… माउली… च्या जयघोषातप्रसिद्ध दत्ता घाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घातले. स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले विणेकरी आणि तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे आणि मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथापुढील आणि नंतर रथामागील विणेकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे दर्शन देण्यात आले. हा अभुतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा मोठ्या उत्साहात पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश केला.

-Ads-

छत्रपती शिवाजी चौकात नीरेचे सरपंच दिव्या पवारसदस्य अनिल चव्हाणतंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे यांनी सोहळ्याचे स्वागत केले.अहल्याबाई होळकर चौकातून नीरेतील युवकांनी रथातील पालखी खांद्यावर घेऊन येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरा ठेवली. यावेळी नीरेसह परिसरातील भाविकांनी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रांगा लावून माउलींच्या पादुकांचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दुपारी अडीच वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने वाल्हा गावाकडे मुक्कामासाठी मार्गक्रमण केले.

माउली सेवा मंडळाचे अन्नदान
माऊली सेवा मंडळकल्याण यांच्या वतीने वारीच्या परतीच्या प्रवासात अन्नदान करण्यात आले. ज्याठिकाणी परतीच्या प्रवासात हा सोहळा विसाव्यासाठी थांबतो किंवा मुक्काम करतोत्या ठिकाणी या मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात येते.याबात मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले की,पंढरपूरला जाताना अनेक दाते अन्नदान करीत असतात. मात्रपरतीच्या प्रवासात याकडे दुर्लक्ष होते म्हणून आम्ही परतीच्या प्रवासात अन्नदानकरीत असतो.

नीरा: येथे माउलींच्या पादुकांना उत्साहात स्नान घालण्यात आले
नीरा येथे परतीच्या सोहळ्यासोबत असलेले वारकरी

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)