परतीच्या वाटेवर वाल्हयात माऊलींचे स्वागत

वाल्हे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या वाटेवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता वाल्हे येथे पोहचला. वाल्हे येथे सरपंच अमोल खवले व ग्रामस्थांनी उत्साहात पालखीचे स्वागत केले. महर्षी वाल्मिकी विद्यालयात आज पालखी मुक्कामी असणार असून शुक्रवारी सासवडकडे मार्गस्थ होणार आहे.
चौरिचे मानकरी बाळासाहेब मांडके यांनी पालखीला खांदा दिला. यावेळी पोलीस पाटील प्रविण कुमठेकर, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार, अंजली कुमठेकर, दिपाली भोसले समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. महर्षी वाल्मिकी विद्यालयात वारकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी माउलींच्या दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)