परतीच्या पावसाला सुरुवात

पुणे – राज्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मान्सून परतला आहे. दरम्यान, राज्यातून सोमवारपर्यंत पूर्णत: मान्सून माघारी परतेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 27 रोजी परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश,गुजरात, मध्य प्रदेशमार्गे राज्यात बुधवारी दाखल झाला. राज्यात नंदूरबार, धुळे, जळगाव, गोंदिया या जिल्ह्यांसह उत्तरेकडील काही भागांतून मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर लवकरच उर्वरित महाराष्ट्रातील सुद्धा मान्सून निघून जाईल.

दरम्यान, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)