परतीच्या पावसाने चोहिकडे पाणीच पाणी

नाणे मावळ – सलग चार दिवस मान्सूनच्या परतीच्या पावसाने मावळच्या शेतकऱ्यांची चिंता दूर केली. शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाचच्या सुमारास कामशेत परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनाचा वेग मंदावल्याचे दिसून आले.पावसाच्या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की सर्व वाहने दिवे आणि इंडिकेटर्स लावून वाहन चालवत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

दीड महिन्यांपासून गायब झालेल्या पावसामुळे मावळातील भातपीक धोक्‍यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक जोमत आले आहे. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मावळात जोरदार वाऱ्यासह पावसाचे पुनरागमन झाल्याने चिंतातूर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पिकांना जीवदान मिळाले आहे. जोरदार पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)