परतीच्या पावसाचा राज्यात जोर साताऱ्यात ही पावसाची हजेरी

पुणे,दि. 30 (प्रतिनिधी)मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असताना आता राज्यात ही पावसाने जोर धरला आहे.गेले दोन दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र व कोकणातील विविध ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान , साताऱ्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरींनी ही हजेरी लावली.

पावसाचा आता परतीचा पाऊस झाला आहे,त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची आशा निर्माण झाली आहे.अद्याप हा परतीचा मान्सून महाराष्ट्रात पोहचलेला नाही.त्यापुर्वीच राज्यात विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.ठाणे, रायगड,सिंधूदुर्ग,पुणे,कोल्हापूर,सातारा ,सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस पडला.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालूक्‍यात पण जोरदार पाऊस झाला.सातारा जिल्ह्यात ही अनेक भागात गेले दोन दिवासांपासून रोज सायंकाळी पाऊस पडत आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सातारा शहराला ही झोडपून काढले. गेले तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पाऊस पडत असल्याने पिकांना थोडे जिवदान मिळाले आहे. रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)