परतीचा मुसळधार बरसणार?

वेधशाळेचा अंदाज : तापमानही वाढले

पुणे – लक्षद्वीप आणि मालदिव बेटांवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यातच अरबी समुद्रामध्ये शनिवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशाच्या वायव्य भागातून वारे परतले आहेत. राज्यात मान्सूनचे अस्तित्व असून, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात सध्या ऑक्‍टोबर हीट वाढली असून, जळगाव येथे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारपर्यंत पूर्व आणि मध्य भारतातील आणखी काही भागातून मान्सूनची माघार शक्‍य आहे. गुरुवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)