परजणेगटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हेगटात प्रवेश

काळे, बोरनारे, जगताप, ससाणेंचा समावेश
कोपरगाव – तालुक्‍यातील संवत्सर येथील परजणेगटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेगटात प्रवेश केला.
रत्नाकर दशरथ काळे, दिनेश कारभारी बोरनारे, राकेश नंदकुमार जगताप, संतोष दशरथ ससाणेव सुधाकर कारभारी बोरनारे यांनी परजणे गटाला सोडचिठ्ठी देत कोल्हे गटात प्रवेश केला.
त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेअध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हेयांच्या हस्तेसत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे, संजीवनी पतसंस्थेचेसंचालक राजेंद्र परजणे, भाजप दिव्यांग सेलचेअध्यक्ष मुकुंद काळे, महेश परजणे, विकी बोरनारेउपस्थित होते. बिपीन कोल्हेम्हणाले, संवत्सर परिसरात संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सरकार तसेच कारखान्याच्यावतीनेविकासाची कामे केली. आमदार कोल्हेयांनीही रस्ते, वीज, पाणी प्रश्‍नांना प्राधान्य देत निधी मिळवून कामे पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)