पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी होता फरार
सातारा – साताऱ्यातील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील व पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या पप्पू घुलेला अखेर अटक झाली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने त्याला दोन साथीदारासह ताब्यात घेतले आहे. साताऱ्यात विविध गुन्हे करून करून फरार असलेला दत्ता जाधव जत मध्ये असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर तत्कालीन परिविक्षाधीन एसपी पवन बनसोड यांनी जत येथे येथे छापा टाकला होता. त्यावेळी यात्रेच्या कार्यक्रमात असलेल्या दत्ता जाधव व त्याच्या टोळीने सातारा पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. त्यानंतर पोलिसांनी दत्ता जाधव याचा भाऊ युवराज याला व काही लोकांना अटक केली होती. तर बाकी लोक फरार झाले होते. त्यातील सुरज उर्फ पप्पू घुले रा. गोडोली हा पोलिसांच्या रडारवर होता. त्याला शोधण्यासाठी सांगली पोलिसांनी साताऱ्यात अनेकवेळा छापे टाकले होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने त्याला शुक्रवारी पकडला.

दरम्यान पप्पू घुले पुसेगाव येथे फिरत असल्याची माहिती पो.नि. पद्ममाकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पो.उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाला त्यांनी कारवाईच्या सुचान दिल्या होत्या. मिळालेल्या सूचनोनुसार गवसणे यांनी पुसेगाव येथे सापळा लावला होता. त्यावेळी एक काळ्या रंगाची स्कॉर्पीओ त्यांना संशयास्पद फिरताना दिसून आली. त्यांनी ती गाडी थांबवुन खात्री केली. तेव्हा त्यात दोन तरूण होते. त्यांची झडती घेतली असता एक पिस्टल मिळाली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी उत्तरप्रदेश येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यावेळी खटाव येथील हार्डवेअर विक्रेता विरधवल किरण देशमुख याला एक पिस्टल विकल्याचे कबुल केले. याप्रकरणी नितीन भिमराव खरात (वय 26, रा. पुसेगाव) मोक्का मधील आरोपी सुरज उर्फ पप्पू भिमराव घुले (वय 29,रा. गोडोली,सातारा) विरधवल किरण देशमुख (वय 25,रा. खटाव) यांना अटक केली. अटकेतील संशयीतांना न्यायालयात हजर केले असता, दि. 10 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक विजय पवार,पो.नि. पद्ममाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक सागर गवसणे,पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे,संजय पवार,मोहन नाचण,योगेश पोळ,राजकुमार रनावरे,संतोष जाधव,प्रविण कडव, वैभव सावंत,मयुर देशमुख,संकेत माने,मारुती अडागळे,गणेश कचरे यांनी सहभाग घेतला.

घुले,खरातवर गुन्हे दाखल
याप्रकरणात अटकेत असलेल्या सुरज घुले याला साताऱ्यातीक एका हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा खुन केल्याप्रकरणी न्यायालायने दोषी ठरवले आहे. तर नितीन खरात याच्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल असून तो पुणे, सातारा येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडे यापुर्वीही एक पिस्टल सापडले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)